ती वाट बघतेय
ती वाट बघतेय.... गोव्यात प्रत्येक गावात एक सरकारी प्राथमिक शाळा आहे.आमची पिढी ह्याच सरकारी शाळां मधुन शिकली.पहील्यांदाच पहीलीत, पहील्याच शाळेत जातानाची ती बालमनाची घालमेल,उत्सुकता,हुरहुर थोडीशी भिती अशा नानाविविध भावनांचा हिंदोळा त्या बालवयात प्रत्येकाच्या मनात असायचा.आपण सर्वांनीच त्याचा अनूभव घेतला आहेच. गोव्यातल्या सर्वच सरकारी प्रा.शाळा ह्या तशा गावात, निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या.शाळेत जाता येता गावातली जाणती माणसं,शेती साठी लगबग करणारे शेतकरी,सकाळी सकाळी शाळेत जाताना गाई,त्यांची चिमुकली वासरं,बैलांच होणारं दर्शन सारचं काही अनमोल.नविन मित्र,नविन शिक्षक,नवी पाटी, पेन्सील.नवीन पायल चप्पल,सगळच काही नविन,वातावरणच भाराऊन जाणारं व मग अंगळवाणी पडल्यानंतर गावची शाळा कधी आपलं कटुंब बनुन जायची कळायचीच नाही. पावसातल्या दिवसातला पहीला पाऊस,मातीचा सुगंध,छ्त्री असुनही हळूच भिजण्यासाठीचा प्रयत्न ,पावसात बाहेर खेळता येत नाही म्हणून "गुण्यानी खेळणे",हिरांनी खेळणे,मध्येच तासाला "गुरुजी एकी" म्हणून करंगळी दाखऊन एकीला जाणे(त्यावेळी शाळांना शौचालये नव्हती हो,सगळचं निसर...